mahaagrowon.com

सोयाबीन भाव आणखी घसरले शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण चार वर्षातील सर्वांत नीचांकी भावावर सोयाबीन पोहोचले./ Soybean market collapsed.

Share this post

सोयाबीन

         देशातील सोयाबीन बाजारपेठेमध्ये दररोज सोयाबीनचे बाजार भाव हे कमी होताना दिसत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे मागील चार वर्षातील सर्वांचे बाजारभाव काल मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला. महाराष्ट्राचे प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या अमरावती अकोला व लातूर मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा 3500 तर जास्तीत दरा ४३०० इतका प्रति क्विंटल दर मिळाला गेल्या चार वर्षातील दराच्या तुलनेत ह्या वर्षीचे दर हे खूपच कमी राहिले ज्या शेतकऱ्यांनी दर वाढतील या अपेक्षेने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली होती ते आता चिंतेमध्ये आहेत कारण की आता सोयाबीनचे दर हे खूपच खाली कोसळले आहेत शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षाही सोयाबीनचे दर हे खूप मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. शासनाने याकडे लक्ष घालण्याचे महत्त्वाचे आहे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

          जागतिक सोयाबीन बाजारपेठ व भारतीय सोयाबीन बाजारपेठ यांची तुलना

       जागतिक सोयाबीन बाजारपेठेची व भारतीय सोयाबीन बाजारपेठेची तुलना केली असता भारतातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मिळणाऱ्या सोयाबीनचे उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे त्यामानाने अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना येथील शेतकरी भारतापेक्षा जवळपास 30 टक्के इतके जास्त उत्पादन प्रती हेक्टरी येतात इतर देशांमध्ये जीएम सोयाबीनचे बियाणे लागवडीसाठी वापरले जातात परंतु भारतातील लागवडी करण्यासाठी बंदी असल्यामुळे एक हेक्टरी उत्पादनामध्ये खूप प्रमाणात घट झालेली आहे.

           जागतिक बाजारपेठेमध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो सोयाबीन उत्पादनामध्ये तर प्रथमोप क्रमांकावर ब्राझील अर्जेंटिना त्यानंतर चीन व अमेरिका यानंतर भारताचा क्रमांक लागतो जागतिक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा सर्वात जास्त पुरवठा ब्राझील आणि अर्जंट न्यायाधीशामार्फत केला जातो तर सर्वात मुख्य उपभोक्ता चीन हा देश आहे.

हमीभावाने खरेदी करणे आवश्यक

   सोयाबीन बाजारभाव कोसळल्यास शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हास्तरावर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव मिळेल जेणेकरून त्यांना त्या मालाची योग्य किंमत मिळेल सध्या बाजारपेठेमध्ये व्यापारांची मनमानी सुरू असल्याने सोयाबीनचे दर हे आणखीच कोसळत आहेत यावरून असे दिसते की येणार काळात देखील  सोयाबीनचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील

सोयाबीन

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकता व परिस्थिती

    महाराष्ट्र राज्याचा सोयाबीन उत्पादनामध्ये देशात द्वितीय क्रमांक लागतो प्रथम क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य असून त्यानंतर महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक सुरू आहे व त्यानंतर राजस्थानी तृतीय क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. राज्यात सोयाबीन खालील क्षेत्राचे वाढलेले प्रमाण व सोयाबीनची मागणी यामुळे देशातील सोयाबीन उत्पादनामध्ये जे सोयाबीन वापरलं जातं त्याची मागणी कमी झाल्यामुळे भारतातील सोयाबीनचे बाजारभाव विकसित आहे असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे


Share this post
Exit mobile version