काल गुरुवार 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरी साठवून ठेवले होते त्यांच्या सोयाबीनला काल 4000 रुपये 4120 इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला ,ही सोयाबीन मधील सर्वात नीचांकी दोन वर्षांमधील घसरण आहे . हमीभाव दिलेला आहे त्यापेक्षाही कमी रेट या ठिकाणी सोयाबीनला मिळाला त्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये आहे
ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भाव वाढतील या हेतूने शेतकऱ्यांनी आपल्या घरामध्ये सोयाबीन साठवून ठेवले होते त्यात त्यामुळे आता ते ज्या वेळेस विक्रीला काढले त्यावेळेस भाव खूप पडलेला होता त्यामुळे शेतकरी खूप निराश झाले आहेत .
सोयाबीनच्या कोसळणाऱ्या भावाकडे शासनाने लक्ष देणे महत्त्वाचे आहे जेणेकरून हा भावाचा जो समतोल होत आहे ते मर्यादित करता येईल केंद्रशासनाने नुकत्याच सोयाबीन व सोया सारखी किंवा सोयाबीनचे इतर प्रोडक्ट आयात करण्यास सुरुवात केलेली आहे
त्यामुळे भारतीय मार्केटमध्ये भारतीय सोयाबीनचे रेट हे खूप प्रमाणात कमी झालेले आहे ही जर बाब अशी जळत राहिले तर येणाऱ्या सोयाबीनचे दर हे आणखीन कोसळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्याने सांगितले की जागतिक मार्केटमध्ये सोयाबीनच्या विक्रम उत्पादन झाल्यामुळे तसेच आता अमेरिका आणि चीनमधील सोयाबीन देखील मार्केटमध्ये येणार असल्यामुळे सोयाबीनचे रेट खूप प्रमाणात कोसळल्यात आणि यानंतरही कोसळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे
सोयाबीनचा खर्च परवडेना
सोयाबीनच्या सततच्या कोसळणाऱ्या भावामुळे यावर्षी सोयाबीन काढणीचा खर्च देखील सहकार शेतकऱ्यांना परवडणार नाही त्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये वाढ करण्यात येऊन कमीत कमी हमीभावाने तरी शासनाने सोयाबीन खरेदी करावे अशी शेतकऱ्यांची मागणी होत आहे
भविष्यात सोयाबीन बाजारभाव कसे राहतील.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पावसाने पिकांना योग्य प्रमाणात असं पोषण मिळालेला आहे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतो तेवढा पाऊस याठिकाणी महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे त्यामुळे प्रसावीचे पीक हे खूप जोमदार आलेले आहे त्यामुळे उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे व येणार का आधी खेर सोयाबीनचे भाव आहे नसण्याची शक्यता आहे.